Ad will apear here
Next
‘कामगारांसाठी ‘सीएमएआय’चा पुढाकार कौतुकास्पद’


पुणे : ‘व्यापार, उद्योगाच्या विकासात कामगारांचा वाटा मोलाचा असतो. या कामगारांना जपले, तर उद्योगाची वाढ चांगली होते. त्यामुळे कामगारांच्या आरोग्याकडे कंपन्यांनी आणि उद्योजकांनी लक्ष द्यायला हवे. ‘सीएमएआय’ने आपल्या कामगारांच्या आरोग्यासाठी घेतलेला पुढाकार कौतुकास्पद आहे,’ असे प्रतिपादन नगरसेवक आणि पूना मर्चंट चेंबरचे माजी अध्यक्ष प्रवीण चोरबेले यांनी केले.

‘नेत्रदान ही काळाची गरज असून, आपण नेत्रदान जागृतीसाठी काम करावे, तसेच पालिकेच्या वतीने सर्वतोपरी सहकार्य देण्यासह एकत्रित कार्यक्रम राबवू,’ असे चोरबेले यांनी या वेळी नमूद केले.

दी क्लोदिंग मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन ऑफ इंडियाच्या (सीएमएआय) पश्‍चिम विभागातर्फे आणि ससून रुग्णालयाच्या सहकार्याने स्वारगेटजवळील आनंद मंगल कार्यालय येथे कापड उद्योगातील कामगारांसाठी दोन दिवसांचे मोफत नेत्र तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी चोरबेले बोलत होते. या वेळी ‘सीएमएआय’च्या सीएसआर कमिटीचे प्रमुख व्ही. एम. कुलकर्णी, चेअरमन जयंती वीरा, मानद सचिव राजीव आगरवाल, विभागीय सचिव राजाभाऊ महाडिक आदी उपस्थित होते.

‘दोन दिवसांच्या या शिबिरात ७०० ते ८०० लोकांची नेत्र तपासणी व गरजूंना चष्म्याचे वाटप करण्यात आले. तपासणीअंती आवश्यकता असल्यास मोतीबिंदू शस्त्रक्रिया मोफत केली जाणार आहे. ‘सीएमएआय’ भारतीय कापड उद्योगातील महत्त्वाची असोसिएशन असून, १९६२पासून ती कार्यरत आहे. कापड निर्माते, निर्यातदार, व्यावसायिक आदी या संस्थेचे सभासद असून, २० हजार कंपन्या सीएमएआयशी निगडित आहेत,’ असे राजीव अगरवाल यांनी सांगितले.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/CZTQBS
Similar Posts
ससून लिव्हर ट्रान्सप्लांट सेंटरचा लोकार्पण सोहळा पुणे : ससून सर्वोपचार रुग्णालयातील ‘लिव्हर ट्रान्सप्लांट सेंटर’चा लोकार्पण सोहळा, २४ मार्च २०१८ रोजी रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अजय चंदनवाले यांच्या हस्ते संपन्न झाला. ‘अग्रवाल क्लब, पुणे चॅरिटेबल ट्रस्ट’ने यासाठी देणगी दिली. या वेळी विजय मित्तल, सुभाष गोयल, राजेश टेकरीवाल, राजीव अगरवाल आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते
पुणे येथे आरोग्य दिंडीचे आयोजन पुणे : क्षय रोगाचा प्रसार रोखण्यासाठी, क्षय रोगाबाबत जनतेमध्ये जागृती करण्यासाठी बै. जी. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि ससून सर्वोपचार रुग्णालय यांच्यातर्फे आरोग्य जनजागृती दिंडीचे आयोजन आठ जुलै रोजी करण्यात आले होते. या वेळी शेकडोच्या संख्येने उपस्थित असलेल्या वारकऱ्यांना क्षय रोगाची लक्षणे, रोगनिदान,
‘फिनोलेक्स’तर्फे वारकऱ्यांना कापडी बॅग, हरिपाठाचे वाटप पुणे : गेली ३० वर्षे ‘फिनोलेक्स’तर्फे वारकऱ्यांची अखंडपणे सेवा केली जात आहे. दर वर्षी वारकऱ्यांना कापडी पिशव्या, लाडू आणि अल्पोपहार पूरविण्याबरोबरच तीन वर्षांपासून वैद्यकीय शिबिरांचे आयोजनही ‘फिनोलेक्स’तर्फे करण्यात येत आहे.
‘ससून’मध्ये आधुनिक लेसर मशीनद्वारे दंतरोपण पुणे : फिनोलेक्स इंडस्ट्रीज व मुकुल माधव फाउंडेशन यांच्या पुढाकाराने ससून रुग्णालयात आधुनिक लेसर मशीनद्वारे दांतरोपन सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. त्यामुळे आता गरीब रुग्णांना दंतरोपन करणे शक्य झाले आहे.

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language